२६ वर्षांपासून उभारली जाते कळसुबाई शिखरावर गुढी!; निसर्गाचे विहंगम दृश्य एकदा पाहाच | Gudhipadwa
आपल्या प्राचीन सणांची आणि संस्कृतीची जाणीव ठेवून घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे सर्व गिर्यारोहक, सव्वीस वर्षांपासून अखंडपणे कळसुबाई शिखरावर गुढी उभारून मराठी नूतन वर्षाचे स्वागत करतात. यावर्षी देखील गुढीपाडव्याच्या दिनी कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी पहाटे सूर्योदयापूर्वीच सर्वोच्च शिखर सर करून कळसुबाई मातेचा अभिषेक करून, महाआरती केली. त्यानंतर मंडळाच्या सर्व गिर्यारोहकांनी गुढीचे पूजन करून सर्वोच्च कळसुबाई शिखरावर गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला आहे